आजपासून गॅस सिलेंडरचे नवीन दर लागू

1

तेल कंपन्या दर माहिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरचे दर ठरवतात. आजपासून १९ किलो कमर्शियल गॅस सिलेंडरचा दर वाढला आहे. या बदल्याचा सर्वसामान्यांवर परिणाम होणार आहे. नवीन नियमांमध्ये एकीकडे दिलासा मिळेल तर दुसरीकडे काही गोष्टींची काळजी न घेतल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. प्रत्येक राज्यात कर वेगवेळा असल्याकारणाने गॅस सिलेंडरच्या दरात फरक असतो.

इंडियन ऑइलच्या वेबसाईटनुसार दिल्लीतील गॅस सिलेंडर्सच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. चेन्नईमध्ये ६१० रुपये प्रति सिलेंडर, दिल्लीत १४.२ किलो अनुदानित गॅस सिलेंडर फक्त ५९४ रुपये,कोलकतामध्ये ६२०, मुंबईत अनुदानित गॅस सिलेंडरची किंमत ५९४ रुपये इतकी असेल.यापूर्वी जुलैमध्ये एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ४ रुपयांची वाढ झाली होती. १४.२ किलोच्या घरगुती एलपीजीच्या सिलेंडर मध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. ऑक्टोबर, नोव्हेंबरनंतर डिसेंबर मध्ये आढावा घेताना किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईसह अन्य शहरांमध्ये देखील किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. परंतु १९ किलोग्रामच्या कमर्शियल गॅस सिलेंडरमध्ये ५५ रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याची भीती जरी व्यक्त केली जात असली तरी एलपीजी महाग झालेला नाही. एक डिसेंबर पासून म्हणजेच आजपासून भारतात गॅस सिलेंडरच्या दारात मोठे बदल झाले आहेत.