खाजगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या आहेत.अधिकारी ऑक्सिजन पुरवठादार, सहाय्यक आयुक्त आणि अन्न व औषध प्रशासन यांच्यात समन्वय साधून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी घेणार आहेत.
पालिकेचे समन्वय अधिकारी अन्न व औषध प्रशासन, विभागांचे सहाय्यक आयुक्त आणि ऑक्सिजन पुरवठादार यांच्यात समन्वय साधून ऑक्सिजन पुरवठा योग्यरित्या व वेळीच उपलब्ध होत राहील, यासाठी दक्षता घेतील.
पुढील १५ दिवस आणखी महत्त्वाचे आहेत. सध्या, महापालिका, शासकीय आणि खासगी असे दीडशे कोविड रुग्णालय आहेत. या रुग्णालयांमध्ये २० हजार खाटा असून येत्या आठवड्यात आणखी दोन हजार खाटा वाढविण्यात येणार आहेत, असे आयुक्तांनी या बैठकीत सांगितले.
महापालिका या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहा समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार आहे. हे अधिकारी ऑक्सिजन पुरवठादार, सहाय्यक आयुक्त आणि अन्न व औषध प्रशासन यांच्यात समन्वय साधून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी घेणार आहेत.