जगभरात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोक पुन्हा घाबरले आहेत. युरोपातील काही देशांनी महिन्याभरापूर्वी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केली होती. आता जर्मनीनेसुद्धा लॉकडाऊन केले आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचेसह संस्थापक बिल गेट्स यांनी रविवारी एका मुलाखतीमध्ये कोरोना विषाणूच्या साथीमुळे ही पुढील चार ते सहा महिन्यामध्ये परिस्थिती अधिक चिंताजनक होईल अशी भीती व्यक्त केली आहे. अमेरिकेमधील करोना संकटाची दिवसोंदिवस बिघडणारी परिस्थिती पाहून गेट्स यांनी हा इशारा दिला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जगभरात सर्व उपाय करण्यात येत आहेत. तसेच कोरोना लसीवर युद्धपातळीवर संशोधन देखील सुरू आहे.
मुलाखतीदरम्यान बिल गेट्स म्हणाले, कोरोना संसर्गाच्या दरम्यान पुढील चार ते सहा महिने खूपच वाईट असू शकतात. जगभरात आणखी दोन लाख मृत्यू होण्याची शक्यता इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड रिव्होल्यूश यांनी वर्तवली आहे. जर हे मृत्यू रोखायचे असतील तर त्यासाठी सातत्याने मास्क वापरणे, व सामाजिक अंतराचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. गेट्स यांची संस्था करोनाची लस विकसित करण्यासाठी आणि ती जगभरामध्ये उपलब्ध करुन देण्याची वितरण साखळी उभारण्यासाठी सध्या काम करत आहे. अमेरिकेमधील कोरोना संकटाची बिघडणारी परिस्थिती पाहून गेट्स यांनी हा इशारा दिलेला आहे.
गेल्या महिन्याभरात दिलासादायक वृत्त हाती येत असून शास्त्रज्ञांना लस शोधण्यात यश मिळत आहे. भारतीयांनी तयार केलेल्या दोन लस देखील लवकरच उपलब्ध होणार आहेत. अशातच, आता आणखी दिलासादायक वृत्त हाती येत आहे. कोरोनावरील औषध देखील शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे. परंतु बिल गेट्स यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा लोक चिंतेत पडले आहेत. विशेष म्हणजे गेट्स यांनी कोरोनासारखी मोठी साथ येईल, अशी भविष्यवाणी २०१५ मध्येच केली होती असेही समजत आहे.