स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही एनआयए करणार आहे.एनआयएने वाझेंनाचा अटक करताच त्यांनीच स्फोटकांची कार ठेवल्याचे तपासात समोर आले. वाझेंना २५ मार्चपर्यंतची कोठडी सुनावण्यात आली आहे.
भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याप्रकरणीचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून घेत एनआयएकडे (NIA) सोपविलेला असताना आता आणखी एक मोठा धक्का केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला आहे.
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा संबंध अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारशी आहे. अंबानींच्या घराबाहेर आढळलेली कार हिरेन यांच्याच मालकीची होती. त्यामुळेच हिरेन यांच्या मृत्यूचा तपास करण्याची विनंती करण्यात आली होती.
वाझे यांची भूमिका संशयास्पद आढळून आल्याने हा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला. यानंतर एनआयएने वाझेंनाचा अटक करताच त्यांनीच स्फोटकांची कार ठेवल्याचे तपासात समोर आले. वाझेंना २५ मार्चपर्यंतची कोठडी सुनावण्यात आली आहे.