प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेच्या गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यास सुरुवात

7

भारतीय रेल्वेकडून 6,7 आणि 12 जून रोजीपासून 6 समर स्पेशल ट्रेन चालविल्या जाणार आहेत.या ट्रेन्स उत्तर प्रदेशातील झासी, कानपुर, लखनौ, प्रयागराज, वाराणसी, सीतापुर, बलिया सारख्या शहरांमधून जाणार आहेत. 

लॉकडाउन हळूहळून अनलॉक करण्याच्या प्रक्रियेसह प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेकडून काही गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे.

तसेच पश्चिम रेल्वेच्या मते, प्रवाशांची वाढती संख्या पाहता काही स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या आहेत.देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होण्यासह भारतीय रेल्वेच्या गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यास सुरुवात केली आहे.