देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या 80 तासांच्या सरकारची आजही चर्चा होते. या शपथविधीवर तब्बल दीड वर्षांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on sworn surprise ceremony) यांनी मोठं विधान केलं आहे
2019 ला भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद झाले झाले. त्यानंतर अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला.
राष्ट्रवादीसोबतचं सरकार करायला नको होतं. ती चूक आहे. असं सरकार आम्ही स्थापन करायला नको होतं, असंही फडणवीस म्हणालेत. ज्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना आम्हाला उत्तर द्यायचं असल्याचंही फडणवीस म्हणालेत.