समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत संघटन पोहचले पाहिजे – देवेंद्र फडणवीस

9

“समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत भाजपाचे संघटन पोहचवण्याचे कार्य येणार्‍या काळात जवाबदारीने तुम्हाला करायचे आहे” असे कार्यकर्त्यांना ऊद्देशून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत होते. मुंबई येथे आोजित करण्यात आलेल्या भाजपा अनूसुचीत जमाती मोर्चाच्या बैठकीला त्यांनी संबोधित केले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनुसुचीत जमातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लागू केलेल्या योजनांचा आणि त्या योजनांचा झालेला लाभ याचा पाढाच वाचला. प्रधानमंत्री आवाज योजनेच्या माध्यमातून मातंग समाजासाठी भरीव कार्य करण्यात आले आहे. मातंग समाजाला स्वत:ची घरे बांधण्यास मोठ्याप्रमाणात मदत करण्यात आली. भाजप सामाजिक न्यायास कटिबद्द आहे. सध्याच्या राज्यातील सरकारचा सामाजिक न्याय हा केवळ भाषणापुरता विषय आहे अशी टीकादेखील यावेळी त्यांनी राज्य सरकारवर केली.

बार्टीच्या माध्यमातूनसुद्धा अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. विद्यर्थ्यांना वस्तीगृहे तसेच त्यांच्या विदेशी शिक्षणासाठीसुद्धा पुढाकार घेण्यात आला आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ईंदू मिलमधील स्मारकासाठीच्या जागेचा प्रश्न मोदीजींनी केवळ ३ दिवसात मार्गी लावला. तसेच लंडनमधील. बाबासाहेबांच्या घरांस स्मारकांत रुपांतरीत करण्यात आले आहे.

अनूसुचीत जाती मोर्चाच्यावतीने मागील काही काळापासून अनूसिचित जातींसाठी भाजप भरीव कार्य करते आहे. अनूसुचित जातीतील समाज हा आपल्या समाजाचाच भाग आहे. त्यामुळे त्यांना मुख्य प्रवाहात आणणे ही आपली जवाबदारी आहे. यापुढीलही योजनांचा उपयोग जास्तीत जास्त लाभार्थ्यांना घेता यावा यासाठि आपल्याला काम करायचे आहे. संघटनेला तळागाळापर्यंत न्यायचे आहे. यासाठि तुम्हाला कामाला लागायचे आहे असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.