राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी होत असल्याने उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांची (ॲक्टिव्ह रुग्ण) संख्या एक लाखाच्या आत आली आहे. काल ८२३२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून राज्यात आजपर्यंत एकूण १५ लाख ७७ हजार ३२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.७१ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ५०९२ नवीन रुग्णांचे निदान झाले, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात काल एकूण ९६ हजार ३७२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज ११० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. कालपर्यंत तपासण्यात आलेल्या ९४ लाख ४० हजार ५३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख १९ हजार ८५८ (१८.२२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ५१ हजार ३२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७९१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.