बारामतीनजिक ब-हाणपूर येथे पुण्यातील पोलिस मुख्यालयावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने पोलिस उपमुख्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली होती. या साठी 220 कोटी 33 लाख रुपयांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबतचा प्रस्ताव दाखल झाला होता.
दुसरीकडे कारागृहाची रचना करतानाही पुरुष व महिला कैद्यांसाठी स्वतंत्र बराकी उभारण्यात येणार असून कुंपण, लँडस्केपिंगसह सीसीटीव्ही व इतर बाबींचा समावेश करण्यात येणार आहे.
बारामतीनजिक ब-हाणपूर येथील पोलिस उपमुख्यालयासाठी 142 कोटी 62 लाख तर येथील कारागृहाच्या बांधकामासाठी 14 कोटी 96 लाख रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
मंत्रालय स्तरावर सुधारणा करुन या कामासाठी 142 कोटी 62 लाख रुपयांच्या खर्चाच्या अंदाजासह प्रस्तावास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.