नकावरून मास्क खाली आला म्हणून पोलिसांची रिक्षाचालकाला बेदम मारहाण

13

महाराष्ट्रासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावलं जात आहे. मध्यप्रदेश मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं अनेक ठिकाणी नियम कडक करण्यात आले आहेत.

मध्यप्रेशात एका व्यक्तीने मास्क नाकावरून घातल्याने मध्यप्रदेशच्या दोन पोलीसांनी मिळून एका व्यक्तीला भर रस्त्यात बेदम मारहाण केली आहे. सदरील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल झाला आहे.

कृष्णा नावाचा व्यक्ती मध्यप्रदेशमध्ये रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम करतो. स्वतःचा आजारी वडिलांना भेटण्यासाठी कृष्णा रुग्णालयात जात होता. इंदौरमध्ये मंगळवारी कोरोना तपासणी मोहीम सुरू होती. त्यावेळी कृष्णाचा मास्क नाकाच्या खाली गेला होता. दरम्यान कृष्णाला अडवून मास्क व्यवस्थित नसल्यानं बेदम मारहाण करण्यात आली.

पोलिसांनी कृष्णाला पोलीस ठाण्यात येण्यास सांगितलं. वडिलांना भेटायला जात असल्याने त्याने पोलिसांना त्यांच्यासोबत येण्यास नकार दिला. बाचाबाची झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी कृष्णाला बेदम मारहाण केली.