फेमस सिंगर नेहा कक्कर हिने काल इन्स्टाग्रामवर तिचा बेबी बंप फोटो शेअर केला होता. हा फोटो सगळीकडे व्हायरल झाला. हा फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले असून त्यांनी नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंहला नवीन पाहुण्याच्या आगमनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. परंतु सर्वांना 2 महिन्यांपूर्वी लग्न झालेली नेहा इतक्या लवकर गरोदर कशी काय राहिली? असा प्रश्न पडला होता. ही बातमी सोशल मिडियावर खूप व्हायरल देखील झाली आहे.
दरम्यान, या सर्व चर्चांना उत्तर देत नेहाने या फोटोमागील सत्य आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. सोशल मिडियावरुन तिने याबाबत माहिती दिली आहे. रजत नागपाल दिगदर्शित नवीन अलब्म असून बब्बू हे या गाण्याचे गीतकार आहेत. या अल्बमच्या प्रमोशनसाठी नेहा कक्कर ने हा फंडा वापरला आहे. आणि तो खूप व्हायरल देखील झाला आहे. नेहा कक्कड आणि रोहनप्रीत 24 ऑक्टोबर 2020 ला विवाह सोहळा संपन्न झाला आहे. नेहा कक्कर गरोदर नाही. या अलब्म सॉंगच्या पोस्टर शूटचा हा फोटो आहे. तिने या अल्बमची पोस्ट करुन माहिती देताच या पोस्टला काही मिनिटांतच 4 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले होते.