– श्रीपाद नागनाथ राऊतवाड
जिल्ह्यात सरपंच पदांसाठी आरक्षण सुटले अन भावी सरपंचांनी चांगलीच कंबर खसलेलं दिसतेय. नांदेड जिल्ह्यातील १ हजार ३०९ ग्रामपंचायतिचे सरपंच पदासाठी १९ डिसेंबर रोजी संबंधित तहसीलदारांनी आरक्षण जाहीर केले असून, जिल्ह्यातील नेत्यांची अवस्था ‘थोडा खुशी,थोडा गम’,अशीच निर्माण झालेली दिसतेय.
सण २०२०-२५ या कालावधीसाठी राज्यात ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर करून स्थानिक संस्थेच्या राजकारणातील नेत्यांच्या पायाला मात्र घुंगरूच बांधले गेले.स्थानिक स्वराज्य संस्थेची आणि राजकारणाची पहिली पायरी ठरलेल्या ग्रापंचायतीची सत्ता हाती आल्यावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सोपी जाते. हे राजकीय गणित असल्याने निवडणूकाचे आरक्षण जाहीर होताच ग्रामपंचायत आपल्याच हाती असावे यासाठी नेत्यांचे राजकारण पक्षपातळीवरून सुरू झाले आहे. गावांतील वातावरणात मात्र अत्ता राजकीय रंग भरू लागला आहे. राजकिय चर्चेला उदयान आलं. आरक्षणाच्या पिंजऱ्यात मात्र स्थानिक नेत्यांची थोडीफार गळचेपीच झाली. भावी सरपंच म्हणून झीजवलेले उंबरठे,केलेली सेवा यावर मात्र काहीकाळ पांघरून घालण्याची वेळ आली.
स्थानिक राजकारणात आपला पाया मजबूत करण्यासाठी सदस्यांना विश्वासात घेण्याचा कार्यक्रमास अत्ता वेग आला,थेट जनतेतून सरपंच निवड करण्याच्या फडणवीस सरकारने केलेल्या बदलेस,ठाकरे सरकारने त्या निर्णयास रद्दबातल केला. जनतेतून सरपंच म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाही, अशा तक्रारी आल्या कारणानेच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारनं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवडण्याच्या निर्णयाचा अध्यादेशाने अत्ता ग्रामपंचायत निवडणूकाचे समीकरण पुन्हा जैसे थे परिस्थितीत आले. निवडणूका डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायत पॅनल बनविण्याच्या धावपळीत अडकलेल्या नेत्यांना खेचाखेचीचे राजकारण करण्याची वेळ आली आहे.
नांदेड जिल्ह्यात एकूण १ हजार ३०९ ग्रामपंचायती आहेत. यात बिगर अनुसूचित क्षेत्रात १ हजार १६६ ग्रामपंचायती आहेत. तर अनुसूचित क्षेत्रात १४३ ग्रामपंचायती आहेत. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झालेल्या बिगर अनुसूचित क्षेत्रातील १ हजार १६६ ग्रामपंचायतीत अनुसूचित जातीसाठी २२८ ग्रामपंचायतीचे सरपंच पद राखीव ठेवण्यात आले आहे. तर, अनुसूचित जमातीसाठी ८२, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) ३१५ तर खुल्या गटासाठी ५४१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. अश्या प्रकारे केलेल्या आरक्षणाची वर्गवारी अत्ता काहींच्या स्वप्नांना दाद देतोय तर काहींचे स्वप्न भंग करतोय. तरी राजकारणांच्या रणांगणात एकदा उतरलेला व्यक्ती माघार घेत नाही, म्हणून निवडणूकांची जय्यत तयारी करताना आज भावी सरपंच दिसत आहेत.
विधानसभा लोकसभा निवडणुकी पेक्षा अधिक मतभेद निर्माण होणारे निवडणूक म्हणजे ग्रामपंचायत. देश बदलायचे तर आधी गाव बद्दलले पाहिजे या युक्तीप्रमाणे आपल्या गावचा विकास करण्यासाठी मतदारांपुढे नको त्या आश्वासनांचा डोंगर रचणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना नागरिकही यावेळी चांगलीच दमछाक करतील यात वाद नाही. ग्राम समस्येवर गत वेळी अश्वासनाना बळी पडलेले मतदार बांधवांनो यावर्षी मात्र थोडा विचारच करावा लागेल. पाच वर्षाचा पाढा वाचल्या नंतर जे काही बोध मतदारांच्या हाती येत त्यावर उद्याचा नेत्याचे चित्र उमटवून दिसावे अशी एकमेव आशा.
गाव हा विश्वाचा नकाशा | गावावरूनी देश्याची परीक्षा ||
गावची भंगता अवदशा | येईल देशा ||
यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी किती साध्या सरळ भाषेत गावाचे महत्व अधिरेकीत केलेले आहे. गाव हाच विश्वाचा मूळ घटक असतो, कारण गावपासूनच शहर निर्माण झाले,शहरापासून राज्य निर्माण झाले,राज्यापासून देश निर्माण झाले,अन शेवटी विवीध देश मिळून आपली पृथ्वी निर्माण झाली.त्यामुळे देश्याच्या सामाजिक,आर्थिकदृष्ट्या किती महत्वाचे आहे हे स्पष्ट होते. देशाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर आधी गावे सुधारावे लागेल आणि नंतरच देश सुधारेल. म्हणून ग्रामपंचायतेस देशात महत्वाचे स्थान आहे. या ग्रामपंचायतिच्या खुरघोडीत खुर्चीसाठी रणांगणात उतरणाऱ्या नेत्यांना मतदारांनी तुरंत ओळखावे लागेल.
मोबाईल – 9970052837