कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी राज्य सरकारने टेंडर, किंमत, कोटा वगैरे घोळ घालत न बसता 1 मे पासून 18 वर्षावरील प्रत्येकाला तातडीने लसीकरण सुरु करावे. अन्यथा 1 मे नंतर या वयोगटातील प्रत्येक मृत्यूला राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशारा सुजय विखे यांनी दिला आहे.
देशात आजपर्यंत 14 कोटी लोकांचे लसीकरण झाले असून याचा खर्च केंद्र सरकारने उचलला आहे. असे असताना आपल्या महाराष्ट्रात नव्या पिढीच्या लसीकरणासाठीचा खर्च राज्य सरकार का करु शकत नाही ? असा सवाल करताना विखे म्हणाले .
एक मे नंतर 18-45 वयोगटातील प्रत्येक मृत्यूला राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जबाबदार असेल, हे मी मुद्दाम सांगत आहे, असे म्हणत सुजय विखे यांनी राज्यातील ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.