सांगली जिल्ह्यातील आडपाडीतून दोन दिवसांपूर्वी १६ लाखांचा बकरा चोरीला गेला होता. त्यानंतर त्या बकऱ्याच्या मालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आटपाडी पोलिसांनी त्या १६ लाखाच्या बकऱ्याचा शोध लावला आहे. आणि तो विशेष बकरा शोधून काढला आहे. तसेच बकरा चोरी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आडपाडीत सोमनाथ जाधव यांचा १६ लाख रुपयांचा बकरा अखेर सापडला. बकऱ्याची चोरी करणारे तीन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून हा बकराही पोलिसांनी ताब्यात घेतला.
बकरा सापडल्याने आनंदी झालेल्या मेंढपाळाने आटपाडी पोलिसांचा सत्कार केला आहे. गुलाल उधळत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत आटपाडी शहरातून त्या १६ लाखाच्या बकऱ्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.