राज्यात बर्ड फ्लूचा धोका, पशुसंवर्धन मंत्र्यांचा जनतेला महत्वाचा सल्ला

15

महाराष्ट्रातकोरोना असतानाचं बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने राज्य सरकार पुन्हा चिंतेत पडले आहे. राज्यात फक्त परभणीमध्ये बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचे आढळून आले आहे. राज्यातील इतर भागांत बर्ड फ्ल्यू झाल्याचे निदान अजूनही स्पष्ट झालेले नाही, असं सुनील केदार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, बर्ड फ्ल्यू बाबत अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
सुनील केदार यांनी पत्रकार परिषद घेऊन बर्ड फ्ल्यू बाबतीत सल्ले दिले आहेत. महाराष्ट्रात अजूनही याबाबत काही आढळले नाही. त्यामुळे चिकन, अंडी खाऊ शकता. फक्त 70 ते 80 डिग्री तापमानावर अर्धा तास चिकन- अंडी शिजवा आणि त्यानंतर खा. अर्धा तास चिकन- अंडी शिजवल्यास त्यातील जीवाणू मरून जातात. हे मी सांगत नाही तर संशोधनातून तसं सिद्ध झालं आहे, असं केदार यांनी सांगितले आहे.