निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासन मेमध्ये तयारी करणार आहे. पहिल्या बैठकीत मागील निवडणुकांचा आढावा घेण्याबरोबरच त्रुटी दूर करण्याचे नियोजन केले जाणार असून, प्रशासनाकडून निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
निवडणुकीत प्रथमच तीन सदस्यांची एक प्रभागरचना अस्तित्वात आली होती. अपक्षांच्या मदतीने शिवसेनेने सत्ता काबीज केली. २०११ च्या जनगणनेत १५ लाखांपर्यंत लोकसंख्या पोचली. त्यानुसार २०१२ च्या निवडणुकीत वॉर्डसंख्या वाढली. या निवडणुकीत मनसेने सत्ता काबीज केली होती.
२०११ च्या जनगणनेनुसार आतापर्यंतच्या निवडणुका झाल्या. १४ लाख ८६ हजार शहराची लोकसंख्या आहे. नवीन जनगणनेत २० लाखांपर्यंत लोकसंख्या पोचणार असल्याचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने मतदारांची संख्या वाढणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
मे २०२१ मध्ये निवडणूक तयारीसाठी महत्त्वपूर्ण बैठक घेतली जाणार असून, त्यासाठी १८ मे तारीख निश्चित करण्यात आली आहे. या निवडणुकीत निवडणूक कामांचे सादरीकरण सादर करण्याच्या सूचना प्रशासन उपायुक्तांना आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या आहेत.
महापालिकेच्या सहा पंचवार्षिक निवडणुका झाल्या असून, जानेवारी २०२२ मध्ये सातव्या पंचवार्षिक निवडणुकीला सामोरे जाणार आहे.