विद्यार्थ्यांना देण्यात आलेले गणवेश निकृष्ट दर्जाचे : शिक्षण समितीतील घोटाळे

10

सदस्यांनी शाळांमध्ये लावण्यात आलेल्या सोलर पॅनल व विद्यार्थ्यांना देण्यात आलेले गणवेश निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी करीत सभापती भारती पाटील यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले आहे .

पहिल्या टप्प्यात २८७ शाळांवर सोलर लावण्यात आले आहे. त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून २० टक्के काम शिल्लक आहे. बैठकीत प्रकाश खापरे व दुधाराम सव्वालाखे यांच्यासह इतर सदस्यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत सोलरच्या बाबतीत तक्रारी केल्या. जिल्हा नियोजन समितीकडून पहिल्या टप्प्यात २८७ शाळांवर सोलर लावण्यात येत आहे. त्यासाठी ४ कोटी ८० लक्ष रुपये खर्च येणार आहे.

तत्कालीन पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांना वीज बिलाच्या कटकटीपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी सोलर लावण्याचा निर्णय घेतला.सदस्यांचा आक्रोश लक्षात त्यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून पॉलिमर गणवेश खरेदीसाठी निधी मिळाला. या करता निविदाही काढण्यात आल्या. परंतु, हा विषय समितीसमोर ठेवण्यात आला नाही. सभापतींच्या सूचनेवरून निविदा काढण्यात आल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आल्याचे समजते.

महाऊर्जाकडे हा निधी हस्तांतरित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील शाळांवर सोलर पॅनल लागलेले आहे. हे पॅनल खराब असून निकृष्ट दर्जा आहे. त्याची चौकशी तांत्रिक अधिकाऱ्यांकडून करण्याची मागणी त्यांनी केली. प्रथम सभापती पाटील यांनी टाळण्याचा प्रयत्न केला.