कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या ऊत्पादनात भारत संपूर्ण जगात महत्वाची भूमिका निभावतो आहे. भारतासोबतच अन्य राष्ट्रातसुद्धा भारताकडून लस पुरवण्यात येत आहे. लस वितरण मोहिमेअंतर्गत भुतान, बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ यांसह ६० पेक्षा अधिक छोट्या देशांना लस पुरवण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. “लस मैत्री” ऊपक्रमाअंतर्गत ईतर ६० देशांना मोफत लस पुरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोनासारख्या जागतीक महामारीवर भारताने बर्यापैकी यश मिळवले आहे. आता कोरोना प्रतिबंधात्मक लस ऊपलब्ध झाली आहे. भारत छोट्या ६० देशांना ही लस ऊपलब्ध करुन देणार आहे. भारताच्या या भूमिकेचे जागतीक आरोग्य संघटनेच्यावतीने कौतुक करण्यात येत आहे. तसेच
WHO चे महासंचालक टेड्रॉस अधॉनॉम घेबरियसस यांनी पंतप्रधान मोदींचे ट्वीट करत आभार मानले आहे.
“लस समानतेला भारताने पाठिंबा दर्शविल्याबद्दल भारत आणि पंतप्रधान मोदी यांचे अाभारी आहोत. कोवॅक्स आणि कोविड -१९ वरील लस लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या आपल्या वचनबद्धतेमुळे ६० पेक्षा अधिक देशांना त्यांचे आरोग्य कर्मचारी आणि इतर प्राधान्य गटांना लसी देण्यास मदत होत आहे. मला आशा आहे की इतर देश आपल्या उदाहरणाचे अनुसरण करतील ” असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
भारताने आतापर्यंत विविध देशांना ३६१ लाखांहून अधिक डोस पाठवले आहेत. अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. देशांना लसींचा पुरवठा येत्या आठवड्यात आणि काही महिन्यांत टप्प्याटप्प्याने सुरू राहील. परंतु राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमासाठी देशांतर्गत गरजा लक्षात घेणे महत्वाचे आहे. अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली आहे.