संपूर्ण देशाची लॉकडाऊनच्या दिशेने लवकरच वाटचाल

22

महाराष्ट्रात शनिवारी सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मागील 24 तासांत तब्बल 67 हजार 123 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. तर, 56 हजार 783 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. 

महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये कोरोना चा सर्वाधिक फटका बसला.गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. त्यामुळे सूत्रांच्या माहितीनुसार मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

नागरिकांकडून अनेक ठिकाणी नियमांची पायमल्ली होत आहे, ज्यामुळं कोरोनाची ही भयावह परिस्थिती काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधला. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे या बैठकीला उपस्थित होते. बहुतांश राज्याचे आरोग्य मंत्री, प्रशासनातील आयएएस दर्जाचे अधिकारी आणि उच्च पदस्थदेखील बैठकीला हजर होते .