कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे राज्यातील अनेक महत्त्वाचे कार्यक्रम, सण, उत्सव, बैठका नेहमीप्रमाणे होऊ शकल्या नाहीत. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा नागपूर ऐवजी मुंबईत होणार असून याबाबतचा निर्णय लवकरचं घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोरोना संकटामुळे बिझनेस अँडव्हायजरी कमिटीच्या बैठकीस उशीर झाला होता. हिवाळी अधिवेशनाची तयारी करण्यासाठी कोरोनामुळे वेळ मिळत नाही, त्यामुळे यावर्षी हे अधिवेशन मुंबईत घेतलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले याबाबत सरकार आणि विरोधी पक्षाशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत नागपूर अधिवेशनात चर्चा झाली. कोरोनाचे संकट अजून टळले नाही. कोरोनाची दुसरी लाट ही जानेवारी पर्यंत येऊ शकते असे तज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे.
हिवाळी अधिवेशन महिनाभर आहे. विधिमंडळ सचिवालयाने घेतलेल्या आढाव्यात बांधकाम विभाग व प्रशासनाकडून कामाची माहिती देण्यात आली आहे. त्याआधारे अधिवेशनाबाबत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येते. नागपूर अधिवेशन घ्यायचे ठरल्यास सगळा शासकीय लवाजमा मुंबई आणि इतर जिल्ह्यातून नागपूरला हलवावा लागतो.
कोरोनाच्या संकटामुळे नियत पाळत इतक्या लोकांची राहण्याची सोय कशी करायची? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. नागपूरचे आमदार निवास कोविड सेंटर म्हणून वापरत होते. त्यामुळे आमदार निवासात रहायला आमदारचाही विरोध होऊ लागला आहे. विधिमंडळाच्या सल्लागार समितीमध्ये याबाबत अंतिम निर्णय होणेही अपेक्षित आहे. हिवाळी अधिवेशन नागपुरात होण्याची शक्यता नाही. अर्थात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत काय ठरते हे महतत्त्वाचे असेल. येत्या दोन-तीन दिवसांत याबाबत समितीची बैठक होण्याची शक्यता आहे.