हिंदू ऐवजी मनुवाद हा शब्द वापरायला हवा होता; भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो : कोळसे पाटील

31

अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी
याने पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केले. यावरून भाजपनं पुण्यातील स्वारगेट पोलिसांत सोमवारी तक्रार दाखल केली. भाजपने याविरोधात अक्रमक भूमिका घेतली आहे. सोबतच हिंदू धर्मियांच्या मध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

पुण्यात झालेल्या एल्गार परिषेदत शरजील उस्मानी यांने हिंदू समाज पूर्णत: सडका बनला आहे, असं विधान केलं होतं. शरजीलच्या या वक्तव्यावरुन भाजपनं आक्रमक पवित्रा घेत, तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती.

शरजीलच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या असतील तर त्यांची मी माफी मागतो असे कोळसे पाटील म्हणाले. शरजीलने हिंदू ऐवजी मनुवाद हा शब्द वापरायला हवा होता. असे कोळसे पाटील म्हणाले. मात्र, मी त्याचा निषेध करणार नाही आणि त्याच्या वक्तव्याचं समर्थनही करणार नाही, असं कोळसे-पाटील म्हणाले आहे.