सध्या देशभरात लव्ह जिहाद या प्रकरणाने धुमाकूळ घातला आहे. यावरून देशात राजकीय घमासान देखील सुरू आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारने लव्ह जिहाद कायदा आणण्याची घोषणा केली होती. मात्र हा कायदा लागू होण्याआधी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ तोंडघशी पडले आहेत. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे पुरावे आढळून न आल्याचे समोर आले आहे.
एसटीआयनं लव्ह जिहाद प्रकरणाचा तपास पूर्ण केला असून, त्यामध्ये योगी सरकारची निराशा झाली आहे. सप्टेंबर महिन्यात योगी आदित्यनाथ सरकारने एसआयटीची स्थापना केली होती. लव्ह जिहादचा आरोप झालेल्या 14 प्रकरणांचा तपास करण्याची जबाबदारी या एसआयटीवर सोपविण्यात आली होती. एसआयटीचा तपास पूर्ण झाला असून सोमवारी एसआयटीने आपला अहवाल सरकारपर्यंत पोहोचवला आहे. या प्रकरणात षड्यंत्र असल्या कारणाने किंवा मुस्लिम युवकांना परदेशातुन फिडींग होत असल्याचे कोणतेच पुरावे सापडले नाहीत. असे एसआयटीने आपल्या अहवालात म्हंटले आहे.
कानपुर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी एसआयटीने केलेल्या तपासाची माहिती दिली, ‘लव्ह जिहाद’ या प्रकरणात सामूहिक स्वरूपात धर्मांतर करून लग्न केल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. त्याचबरोबर यामध्ये परदेशातून पैसे पुरवले जात असल्याचं देखील आढळून आलेलं नाही’ असं अग्रवाल यांनी सांगितले. तसेच 14 पैकी तीन प्रकरणात पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. यातील हिंदू मुलीचे वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे. आणि आपण स्वतःच्या इच्छेनुसार मुस्लिम मुलाशी लग्न केल्याचे त्यांनी सांगितले आहे, असे इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अग्रवाल यांनी सांगितले आहे.