संधीचे सोने करता आल्याची भावना राज्यातील सर्वात तरुण सोलापूर जिल्ह्यातील घाटगे गावचे २१ वर्षीय सरपंच ऋतुराज देशमुख यांची आहे. गावासाठी पिण्याच्या फिल्टर पाण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे.
घाटने गावाची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही गावात असलेल्या तीन हातपंपावर अवलंबून होती. कधी हातपंप बंद पडले तर गावातील माय-बापाना दोन-चार किलोमीटर जाऊन पाणी आणावे लागत असे. अलीकडच्या काही वर्षात गावातील या हातपंपाच्या पाण्यात प्रचंड क्षार तयार झाले.
त्यामुळे गावातील अनेक कुटूंबातील वडीलधारी मंडळीना मुतखड्याचा त्रास उद्धभवु लागला होता. ह्या त्रासातून मायबाप गावकऱ्यांना मुक्ती द्यायची असेल तर त्यांना पिण्यासाठी फिल्टरच्या पाण्याची सोय करणे गरजेचं होतं. याचीच दखल घेऊन ऋतुरांने
ऋतुराजने निवडणूकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला तेव्हा त्या मध्ये गावकऱ्यांना वचन दिले होते, तीन महिन्याच्या आत गावकऱ्यांना फिल्टरचं पाणी उपलब्ध करून देईल. निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या कामाच्या मागे ऋतुराज लागला आणि एका महिन्याच्या आत गावकऱ्यांना पिण्यासाठी फिल्टर पाणी उपलब्ध करून दिले. त्यामुळे त्याचे गावकऱ्यांनी कौतुक केलं आहे.