पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ मंगळवारी भाजपचा मेळावा झाला. यामध्ये “तुम्ही ईडी लावाल तर आम्ही सीडी लावू” म्हणताय. मग जरूर सीडी बाहेर काढा, कशाची वाट पाहताय? असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री एकनाथ खडसेंना प्रति-आव्हान दिलेले आहे.
राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करताना “तुम्ही ईडी लावणार तर आम्ही सीडी लावू” अशा प्रकारे घोषणा केली होती. या वाक्याची चर्चा सर्वत्र चालू असताना काही दिवस उलटताचं देवेंद्र फडणवीसांनी यावर उत्तर दिलेले दिसत आहे.
फडणवीस पुढे म्हणाले, ईडीने आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापा टाकला असेल तर त्यांना याबाबत निश्चित काहीतरी माहिती मिळाली असेल. त्याशिवाय ते छापा टाकणार नाहीत. मला याबाबत फारशी माहिती नाही. पण ज्यांनी चूक केलीच नाही त्यांना घाबरायचे कारण नाही. चूक असेल तर ईडी करवाई करेल. आमच्या सरकारच्या काळातील वीज मंडळाच्या कारभाराची चौकशी करणार असाल खुशाल करा असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.