…मग करा लॉकडाऊन; आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा : पृथ्वीराज चव्हाण

34


राज्यात लॉक डाऊन करायचा की नाही याबाबत महाविकास आघाडीत मोठे मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. आता काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचं बघा, असा सल्लाच चव्हाण यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रक काढून या मागण्या केल्या आहेत. राज्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे.

पुन्हा लॉकडाउन करावे यावर प्रशासन, वैद्यकीय तज्ञ, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती आणि सामान्य जनता यांच्यात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. अशोक चव्हाण यांनी लॉकडाऊन करण्यास विरोध केला आहे. बेरोजगार, रोजंदारी मजदूर, कामगारांना आधी मदत करा, नंतरच लॉकडाऊनचा विचार करा, असा सल्लाह चव्हाण यांनी दिला आहे.

लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याआधी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना द्या, लॉकडाऊनचा कालावधी कमीत-कमी ठेवा,लॉकडाऊन काळात बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावा. यासाठी प्रसंगी आमदार व खासदार स्थानिक विकास निधीचा वापर करावा,खासगी वाहनातून प्रवासास मुभा द्या, शेतमाल तसेच इतर औद्योगिक मालाची वाहतूक चालू ठेऊन पुरवठा साखळीवर परिणाम होऊ देऊ नका. अशा पाच मागण्या चव्हाण यांनी केल्या आहेत.