मग मला पाडून दाखवा, उपमुख्यमंत्री अजित पवारांच चॅलेंज

72

राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. राज्याच्या राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असताना दिसत आहेत. विधानसभा सभागृहात एकमेकांवर टिका करत सभागृहात वातावरण गरम होताना पाहण्यास मिळत आहे. महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा शाब्दिक सामना हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील सुरू आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये सभागृहात जोरदार टीकास्त्र सुरू आहेत.

आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारने पुरवणी मागण्या सादर केल्या. सुधीर मुनगंटीवार यांनी पुरवणी मागण्या, हक्कभंग प्रस्ताव अशा विविध मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मुनगंटीवार यावर बोलायला उभे राहिले होते यावेळी चौफेर टोलेबाजी करत होते. भाषण वाढत असल्यामुळे मुनगंटीवार यांना मुद्यावर बोलण्याचे सांगितले असता, आता आम्ही समर्थ आहोत. यावेळी अजित पवारांनी मुनगंटीवारांचं बोलणं संपण्याच्या आतच उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यावर संतापुन सभागृह हे माझे कुटुंब आहे. माझ्या भाषणात जो अडथळा आणतो, तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.

त्यानंतर मुनगंटीवारांचं चॅलेंज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारलं आहे. तुमचं आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा, असं अजितदादांनी वक्तव्य केलं आहे. अजितदादांच्या टोल्यानंतर सभागृहात एकच हश्शा पिकली. दरम्यान, राज्यातील प्रश्नांवर कोणतीही चर्चा होत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणं होत नाही. त्यामुळे मी मेल मागवले. जेव्हा मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा एक कर्मचारी हा संगणक पुसत होता. त्याला विचारलं असता तो म्हणाला संगणक जरा ओलसर झाले आहे. त्यामुळे पुसत आहे. मुळात जनतेचे इतके मेल आले आहे की, संगणकालाही रडू फुटलं आहे, असा टोलाही मुनगंटीवार यांनी दरम्यान मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.