तेव्हा भारतीयांच्या शिस्तीने देशाला संकटातून सावरलं:नरेंद्र मोदी

10

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेद्र मोदी सभागृहासमोर आपले उत्तर देत आहेत. यापूर्वी त्यांनी सोमवारी राज्यसभेत संबोधित करताना कृषी कायद्यांवरही भाष्य केले होते.

करोनाच्या रुपानं देशावर मोठं संकट उद्भवलं, पण देशानं संकटाच्या काळातही आपला मार्ग निवडला. जेव्हा भारताचं कसं होईल असं बोललं जातं होतं. तेव्हा भारतीयांच्या शिस्तीने देशाला संकटातून सावरलं, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी १३० कोटी भारतीयांचं कौतूक केलं.

ज्यांच्या मनात अशी शंका होती, भारतीयांनी खोटी ठरवली. आज आपण जगासमोर आशेचा किरण म्हणून उभं आहोत. लोकशाही भारतीयांच्या नसानसात भिनली आहे. आपला देश विविधतेनं नटला असून, आपलं लक्ष देशाचा विकास आहे,” असं मोदी म्हणाले.

आमची धोरणं, नीती भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेनं असायला हवीत. सभागृहात सदस्यांनी करोनावर सखोल चर्चा केली. प्रचंड लोकसंख्या असलेला देश करोनात कसा तग धरणार अशी भीती बोलली जात होती. पण, याचं श्रेय जात ते १३० कोटी भारतीयांना,” असं म्हणत मोदी यांनी देशवासीयांचं कौतुक केलं.

आव्हानांना आतापासून सामोरं जावं लागेल. येथे जी चर्चा झाली आहे आणि त्यातही काँग्रेसच्या सदस्यांकडून ते रंगावरुन चर्चा करत आहेत. त्यामधील कंटेंटवर चर्चा केली असती तर बरं झालं असतं,” अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १५-१५ तास चर्चा झाली. रात्री १२ वाजेपर्यंत चर्चा झाली. महत्त्वाचं म्हणजे महिला प्रतिनिधींनी यात सहभाग घेतला. सर्वांचे आभार मानतो. राष्ट्रपतींच्या भाषणातील प्रत्येक शब्द प्रेरणादायी होता.असे लोकसभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले,