ऊ.प्रदेशमधील अयोध्या रामजन्मभूमिसंदर्भातील निकला सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी दिला. यानंतर मंदिरनिर्मितीकार्यास वेग आला. दरम्यानच अयोध्येतील राममंदिरनिर्माणात प्रत्येक भारतीयाचा वाटा असावा या हेतून विश्व हिंदू परिषद आणि रामजन्मभूमि समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण भारतभरात निधी समर्पन अभियान राबवण्यात येत आहे. भाजपचा या अभियानात अप्रत्यक्षरित्या सहभाग आहे, हे लपून राहिलेले नाही. अशा वेळेस विरोधकांकडून या अभियानाला धरुन भाजपवर सातत्याने टीका करण्यात येत आहे. यामध्ये आता शिवसेनेचीसुद्धा भर पडली आहे.
“बाबरी मशीद प्रकरणावेळी सर्वसामान्यांचे प्राण वाचवण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर ऊतरले होते. आता पैसे गोळा करण्यासाठी मात्र भाजप रस्त्यावर ऊतरली आहे. रामाच्या नावाने काही लोकं घरोघरी जाऊन पैसे गोळा करत आहे. मात्र ज्यावेळी वातावरण तणावाचे होते. त्यावेळी सर्वसामान्यांचे प्राण वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर होतो.” असे म्हणत ऊद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. मुख्यमंत्री त्यांच्या शासकीय निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर माध्यमांशी बोलत होते.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख तसेच सर्व आमदारांची बैठक वर्षा बंगल्यावर बोलावण्यात आली होती. शिवसेनेला संघटनात्मक बळकटीकरण करण्यासाठी ही बैठक बोलावली असल्याचे सांगण्यात येते. ऊद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरची शिवसेनेची ही पहिलीच सर्वात मोठी बैठक असल्याचीसुद्धा माहिती मिळते आहे.
ऊद्धव ठाकरे यांनी यावेळी रा.स्व.संघावरसुद्धा निशाना साधला आहे. स्वातंत्र्य संग्रामात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठेच नव्हता, असे भाष्य करत भविष्यात शिवसेना भारताचे नेतृत्व करेल असा विश्वाससुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला. रामाच्या नावाचा ऊपयोग करुन भाजप राजकारण करते आहे. “देखो ये काम न करो, राम का नाम बदनाम करो” असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.