पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दर कधी कमी होतील याचा काहीच अंदाज देता येणार नाही, असेही सरकारच म्हणते. मग मार्च-एप्रिलमध्ये दर कमी होतील असे फुगे हवेत का सोडत आहात?,” असा सवाल शिवसेनेनं मोदी सरकारला केला आहे.
थंडी होती म्हणून इंधन दरवाढ झाली, आता थंडी कमी झाली असल्याने दरही कमी होतील” असे म्हटले गेले. ही बनवाबनवी करण्यापेक्षा दर नियंत्रण करा,” अशा शब्दात शिवसेनेनं पेट्रोलियम मंत्र्यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला आहे.
पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसचे दर मार्च-एप्रिलमध्ये कमी होतील असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी रविवारी म्हटले आणि सोमवारी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत २५ रुपयांनी वाढली.
इंधन आणि गॅसच्या वाढत्या दरांवरून शिवसेनेनं सामना अग्रलेखातून काही सवाल करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.