‘या’ मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत : शरद पवार

20

अलिकडेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे केरळमधील नेते पी. सी. चाको यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एका पोलिस निरीक्षकाच्या कारवायांचा राज्य सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होणार नसून या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असा निर्वाळा शरद
पवार यांनी दिला.

महाविकास आघाडीमध्ये वाझे प्रकरणावरून कोणतेही मतभेद नाहीत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सर्व सहकारी पक्ष काम करतात आणि अडचणीच्या मुद्द्यांवर एकत्र बसून मार्ग काढतात, अशी टिपणी पवार यांनी केली. 

अधिकारांचा गैरवापर करणाऱ्यांची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेने करावी यावर महाविकास आघाडीमध्ये कोणतेही दुमत नाही,’ असेही त्यांनी स्पष्टीकरण दिले.

भाजप विरोधात व्यापक व्यासपीठाची नितांत गरज आहे, अशी समविचारी पक्षांकडून व्यक्त होत आहे. आजच माकप नेते सीताराम येचुरी यांनीही या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. परंतु, यावर निर्णय झालेला नाही, असे पवार म्हणाले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी महाराष्ट्रातील घडामोडींसह राष्ट्रीय पातळीवर भाजपला पर्याय उभा करण्याच्या मुद्द्यावरही भाष्य केले.