शिवसेनेने जाहीर केलेल्या संपर्क अभियानाबाबत बोलताना आमदार अॅड आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. ते बोलताना म्हणाले की, घराघरात जाताय?जा जा, मुंबईकर तुमची वाटच पाहत आहेत.
बिल्डर, दारूवाले, टाटाना सवलतींची खैरात, मग सामान्य मुंबईकरांना काय दिलेत? आता उपनगरात एनए टॅक्स वसुली करून पाकिटमारी का करताय?..असे मुंबईकरांचे बरेच हिशेब बाकी आहेतसमुद्राचे पाणी गोडे करायला निघालात मग पावसाचे पाणी घरात घुसते त्याचे काय? त्यामुळे तुम्ही घराघरात जावाच, असा टोला भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी लगावला आहे.
कोरोनाला घाबरून “घराघरात” लपून का बसला होतात?मुख्यमंत्र्यांसह सगळे तुम्ही तेव्हा कुठे होता? एकही रुपयाची मदत का दिलीत नाहीत? अवाजवी वाढीव वीज बिले पाठवून का छळताय? असे प्रश्न त्यांनी उपस्थितीत केले आहेत.
कोरोना लसीबाबत मंत्र्यांनीच गैरसमज पसरवले. राज्यातील साडेचार लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरणच झाले नाही. सरकार अपयशी ठरले. महाराष्ट्रात रडव्यांचे रडगाणे सुरुच राहिले आणि पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे, अशी टीका केली.