शहरातून होते आहे महाविर गार्डन सौंदर्यीकरणाची मागणी

25

कारंजा शहराच्या दक्षिण भागात दसरा मैदान परिसरात महाविर गार्डन आहे. गेल्या दहा वर्षापासून गार्डन अोस पडले आहे. नगरपरिषद कारंजा अंतर्गत येणार्‍या महाविर गार्डनचे पुन्हा सौंदर्यीकरन करण्यात यावे अशी मागणी शहरातून जोर धरु लागली आहे.

महाविर गार्डनची निर्मीती नगरपरिषद कारंजाच्यावतीने करण्यात आली होती. दसरा मैदान परिसरात हे गार्डन आहे. लहाण मुले, विद्यार्थी, जेष्ठ व्यक्ती यांची कायम या गार्डनमध्ये वर्दळ असायची. मात्र गेल्या दहा वर्षापसून गार्डनची दैन्यावस्था झाली आहे. या पार्श्वभूमिवर गार्डनचे नुतनीकरण करुन ऐतिहासिक शहर म्हणून अोळख असणार्‍या कारंजा शहराच्या सौंदर्यात भर घालावी अशी मागणी शहरात सर्वत्र होते आहे.

कारंजा-मानोरा मतदारसंघाचे आ. राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहाय्यक संजय भेंडे यांनी गार्डनच्या नुतनीकरणाचा मुद्दा ऊपस्थित केला आहे. त्यापाठोपाठ दसरा मैदान परिसरातील स्थानिक युवकांकडूनसुद्धा गार्डनच्या नुतनीकरणाची मागणी केली जाते आहे. महाविर गार्डनला नव्याने सुंदर रुप दिल्यास नक्कीच याठिकाणी शहरातील जनतेची वर्धळ वाढणार, परिणामी स्थानिक युवकांना यामुळे रोजगारसुद्धा मिळू शकते असेसुद्धा युवकांचे म्हणने आहे.