२ डिसेंबर २०२० पासून घेण्यात आलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक आढावा धोरण बैठकीत व्याजदरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तीकांतदास यांनी दिली. आरबीआयने कोरोनादरम्यान रेपो दारात १.१५ टक्क्यांनी कपात केली आहे.
हा निर्णय महागाईचा उच्च स्थर लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे की कोरोना पँडेमिकमुळे चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ९.५ टक्क्यांनी घसरेल. चलन वाढ सध्या रिझर्व्ह बँकेच्या समाधानकारक पातळीवर आहे. रेपो दर ४ %, रिव्हर्स रेपो दर ३.३५%, कॅश रिझर्व्ह रेशो ३% आणि बँक रेट ४.२५% या स्थरावर कायम आहे.
यावर्षी आरबीआयने रेपो रेट दरात १.५५ टक्क्यांनी कापात केली आहे. २२ मे पासून दरात कोणताही बदल झालेला नाही. या कपातीनंतर वर्ष २००० नंतर रेपो रेट ४ टक्क्यांवर आहे. जो की निचांकी स्थर आहे. दरात कोणतेही बदल न केल्यामुळे आत्ता सामान्यांना स्वस्थ EMI साठी वाट पाहावी लागणार आहे.