काम करतांना प्रसिद्धीची गरज नाही; माझ्या कार्यालयाला स्वतंत्र सोशल मीडिया यंत्रणेची गरज नाही : अजित पवार

11

उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी दिले आहेत.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मीडिया यंत्रणा नियुक्त करण्यासाठीचा शासन निर्णय बुधवारी जारी झाला होता. मात्र अजितदादा पवार हे प्रसिद्धीपासून दूर राहून आपले काम करत असतात.

त्यांना काम करताना कोणत्याही प्रसिद्धीची गरज भासत नाही. त्यामुळे हा शासन निर्णय रद्द करुन शासकीय जनसंपर्क विभागाद्वारेच त्यांच्या कामाबद्दलची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जाईल, असे उपमुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता त्यांच्यासाठी विशेष स्वतंत्र सोशल मीडिया यंत्रणा नसेल.