पंढरपूर पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपने केलेल्या टिकांवर पलटवार केला.
सरकार बदलणे म्हणजे येडय़ा गबाळ्याचे काम नाही, असे सांगत स्वतःचे आमदार फुटून आमच्याकडे येऊ नयेत म्हणून भाजपकडून सरकार बदलाच्या वावडय़ा उठवल्या जात आहेत, असा जबरदस्त पलटवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
तसेच पोटनिवडणुकीच्या माध्यमातून सुरू असलेले राजकारण अत्यंत घाणेरडय़ा पद्धतीने होत आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमचा प्रस्ताव होता, असा चुकीचा प्रचार भाजप करीत आहे. असेही पवार म्हणाले.
मागील काही सभांमध्ये देवेंद्र फडणवीस हे ‘केंद्रातून मंगळवेढा पाणीपुरवठा योजनेसाठी निधी आणतो’, असे सांगत आहेत; मग गेली पाच वर्षे राज्यात व केंद्रात त्यांचेच सरकार होते, त्यावेळी त्यांना कुणी अडविले होते, असा सवालही त्यांनी केला.