अन म्हणून आयोध्येतील मशिदीसाठी निधी जमवणे आणि या मशीदीत नमाज पठण करणे हराम आहे :असुद्दीन ओवेसी 

13

मुस्लीम समाजाला अयोध्येत मिळालेल्या पाच एकर जमीनीवर प्रजासत्ताकदिनी मशीदीची पायाभरणी करण्यात आली. त्यानंतर याबाबतचे वातावरण तापत असल्याचे दिसत आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी याबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू झाला आहे. 

अयोध्येत उभारण्यात येणारी मशीद इस्लामच्या सिद्धांताविरोधात आहे. बाबरी मशीदीच्या मोबदल्यात ही जागा देण्यात येत असल्याने त्यावर बनवण्यात येणारी मशीद नसून ती ‘मस्जिद ए जीरार’ आहे. दरम्यान मशिदीसाठीची जमीन सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे ती अवैध ठरत नाही. 

तसेच याची तुलना ‘मस्जिद ए जीरार’ शी होऊ शकत नाही. त्यामुळे औवेसी यांचे म्हणणे अयोग्य आहे, असल्याचे हुसैन यांनी नमूद केले आहे.त्यामुळे इस्लामच्या सिद्धांतानुसार ती मशीद नाही. त्यामुळे या मशीदीसाठी निधी जमवणे आणि तेथे नमाज पढणे हराम असल्याचे औवेसी यांनी म्हटले आहे.

इस्लामच्या शरीयतचे ते जाणकार नाहीत. त्यामुळे शरीयत आणि इस्लामी कायद्यात त्यांनी हस्तक्षेप करू नये, असे हुसैन यांनी म्हटले आहे.औवेसी राजकारण आणि संविधानाच्या माहितीचे तज्ज्ञ असू शकतात.

ओवेसींच्या या वक्तव्याचा मशीदीसाठी बनवण्यात आलेल्या विश्वस्तातील इंडो इस्लामिक फाऊंडेशनचे सचिव अतहर हुसैन यांनी खरपूर समाचारा घेतला आहे.