अन म्हणून हा कार्यक्रम शुक्रवारी ‘उत्सव’ म्हणून साजरा करण्याचा भाजपचा निर्णय

49

पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकरी कुटुंबीयांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी 6 राज्यांतील शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि किसान कल्याण निधी, शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने घेतलेल्या इतर उपक्रमांविषयी त्यांचे अनुभव सांगतील. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेपंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. भाजपाने हा कार्यक्रम शुक्रवारी ‘उत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय.या आयोजित कार्यक्रमांमध्ये एक कोटी शेतकरी सहभागी होतील हे सुनिश्चित करण्यात आलेय

या महोत्सवाच्या निमित्ताने देशभरातील भाजप नेते आणि शेतकरी वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होतील, असेसुद्धा त्यांनी सांगितले. देशातील 19 हजारांहून अधिक ठिकाणी या निमित्तानं कार्यक्रम आयोजित केले जातील. या कार्यक्रमांमध्ये एक कोटीहून अधिक शेतकर्‍यांचा सहभाग निश्चित केला गेलायया कार्यक्रमांतर्गत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंतीदेखील देशात साजरी केली जाणार आहे. 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून भाजपा हा दिवस ‘सुशासन दिन’ म्हणून साजरा करतो.