त्यामुळे महाविकासआघाडी सरकारला कुठलाही धोका निर्माण होणार नाही : नितीन राऊत

11

महाविकास आघाडी हे सरकार पाच वर्षे चालेल. हा वैचारिक वाद चर्चेच्या माध्यमातूनच सोडवला जाईल, त्याचा सरकारशी कोणताही संबंध नाही, असे काँगेसचे नेते नितीन राऊत यांनी सांगितले. 

तसेच पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही असला तरी त्यामुळे महाविकासआघाडी सरकारला कुठलाही धोका निर्माण होणार नाही, असे वक्तव्य राऊत यांनी केले.

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, त्याठिकाणी पदोन्नतीमध्ये आरक्षण आहे. मग महाराष्ट्रात ते का लागू करू नये, असा सवाल नितीन राऊत यांनी विचारला.ते गुरुवारी मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.