पुण्याच्या सीरम इन्सिट्यूटमधून कोरोना लस वेगवेगळ्या राज्यात पाठवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आठ प्रमुख डेपोंमध्ये बुधवारी संध्याकाळपर्यंत लस दाखल होणार आहे. 16 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होईल. राज्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना ही माहिती दिली.
कोरोनाची लस ही सरसकट सर्व लोकांना देता येणार नाही. यामधून काही लोकांना वगळण्यात आल्याचे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. काही लोकांना कोरोनाची लस देता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
18 वर्षांखालील लहान मुले, गरोदर किंवा स्तनदा माता आणि कोणत्याही प्रकारची एलर्जी असणाऱ्या लोकांना कोरोनाची लस देता येणार नाही, असे आरोग्य राज्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.