“ते माझी खालच्या पातळीवर बदनामी करत आहेत; मानसिक त्रास देत आहेत” : तृप्ती देसाई

37

समजसेविका, आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पीडित महिलेसह पत्रकार परिषद घेऊन केली होती. मात्र, त्यानंतर आता सोशल मीडियावर विटेकर समर्थकांकडून बदनामी केली जात असून मानसिक त्रास दिला जात असल्याचं तृप्ती देसाई यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे.

दरम्यान, तृप्ती देसाई यांनी फेसबुक पोस्ट करून राजेश विटेकर समर्थक सोशल मीडियावर माझी खालच्या पातळीवर बदनामी करीत असून, मानसिक त्रास देत असल्याचं म्हटलं आहे.

एखाद्या पीडितेला न्याय देण्यासाठी मोठ्या नेत्याच्या विरोधात समोर आल्यावर नेत्यांचे समर्थक आवाज उठवणाऱ्या महिलेलासुद्धा बदनाम करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असतात याचे मूर्तिमंत उदाहरण असल्याचंही तृप्ती देसाई यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मी पीडितेबरोबर शेवटपर्यंत आहे आणि राहणार आणि लवकरच सर्व पुरावे घेऊन परभणीत येणार असल्याची घोषणा त्यांनी करत, अशा धमक्यांना मी भीक घालत नाही परंतु तुमची मानसिकता जनतेला दाखवने तितकेच गरजेचे आहे म्हणून हे स्क्रीन शॉट पाठवले आहेत. असा इशारा त्यांनी विटेकर समर्थकांना दिला आहे.