५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यात येत आहे. आणि त्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि भाजपने देशभरातून निधी गोळा करण्यास सुरुवात केली आहे. राम मंदिरावरून माजी केंद्रीय मंत्री आणि झाबुआ येथील काँग्रेसचे विद्यमान आमदार कांतिलाल भूरिया यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहेत.
भाजप नेते राम मंदिराच्या नावाने वर्गणी जमा करतात आणि त्या पैशातून संध्याकाळी दारू ढोसतात, असे वादग्रस्त वक्तव्य कांतिलाल भूरिया यांनी केले असून त्यावरून आता संताप व्यक्त केला जात आहे. कांतिलाल भूरिया यांनी हे वादग्रस्त वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली आहे. भूरिया यांच्या या वक्तव्यावरून मध्यप्रदेशातून तसेच देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
कांतिलाल भूरिया यांनी हे वादग्रस्त वक्तव्य मध्यप्रदेशातील पेटलावद येथे एका धरणे आंदोलनादरम्यान केले. दोनदा केंद्रीय मंत्री, 5 वेळा खासदार भूरिया हे राहिलेले आहेत. ते सध्या आमदार आहेत. अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यात येत असून त्यासाठी संपूर्ण देशातून विश्व हिंदू परिषद आणि भाजपने वर्गणी जमा करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान राम मंदिर निर्मितीचे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते कमलनाथ यांनीही स्वागत केले होते. अयोध्येत राम मंदिर व्हावे, असे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनाही वाटत होते, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटल्यानंतर काँग्रेस नेत्यांनीही मंदिरासाठी निधी गोळा करण्यास सुरुवात केली होती.