शिवसेना नेते अनिल परब, कॉंग्रेस नेते अमित देशमुख आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी राज्यपालांची भेट घेत, बंद लिफाफ्यात राज्यपाल नियुक्त विधान परिषदेसाठी १२ नावं सादर केली आहेत. आता या बंद लिफाफ्यातील नावांना राज्यपाल तात्काळ मंजुरी देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहेत. यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत राज्यपाल भागतसिंग कोश्यारी यांना उपहासात्मक टोला लगावला आहे. : “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सुज्ञ आहेत. राज्यपालांवर आमचं प्रेम आहे आणि त्यांचंही आमच्यावर प्रेम आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेले राज्यापाल नियुक्त 12 सदस्यांची नावं नाकरणार नाहीत,” अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
“महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे लोकशाही मार्गाने, संपूर्ण घटनात्मक कायद्याचा आधार घेत सत्तेवर आलं आहे. ठाकरे सरकार हे घटनात्मक सरकार आहे. राज्यपाल हे या राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. राज्यपालांचं जे मत आहे, त्या मताचा आदर आम्ही नेहमी करतो. शेवटी कॅबिनेटचा निर्णयाचे पालन राज्यपालांना करावा लागतो.” अस संजय राऊत यांनी म्हटलं आहे.