हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पहोचपावती: सुप्रिया सुळे

11

नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्टेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. पुणे मतदार संघात तब्बल २० वर्षांनीं भाजपला पराभवाला तोंड द्यावं लागलं आहे. या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी हा लोकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आणि मिळालेले हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पहोचपावती आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

विधानसभेच्या पदवीधर मतदान संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत .

या यशासाठी अहोरात्र कष्ट करणारे कार्यकर्ते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी कष्ट घेतले. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. सर्वांच्या सुनियोजित अशा संघटित प्रयत्नांतून हा विजय साकारला आहे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.