‘टायगर 3’ मध्ये झळकणार सलमान आणि कॅटरीनासोबत ‘हा’ अभिनेता

6

कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात अडचणीत आलेले बॉलिवुड आता हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे चित्र दिसत आहे. विविध सिनेमांंच्या इनडोअर आणि आउटडोअर शुटिंगला सुरवात झाली आहे. सलमान खान आणि कटरिना कैफ  त्यांच्या ‘टायगर – 3’ चं शूटिंग दुबईमध्ये करणार असल्याची चर्चा होती. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार ते शूटिग इस्तंबूलमध्ये करणार आहेत.

दरम्यान, या सिनेमाबाबतची मोठी बातमी समोर आली आहे. टायगर 3 चे निर्माता यशराज फिल्मस यांना सिनेमात खलनायकाच्या भूमिकेसाठी नवा चेहरा हवा आहे. अशी माहिती समोर आली आहे, की या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी याची खलनायकाच्या भूमिकेसाठी निवड झाली आहे. या चित्रपटात इमरान कटरिना आणि सलमानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, इमरानला या सिनेमातील खलनायकाच्या भूमिकेसाठी घेतले गेले आहे.