भाजपच्या या मोठ्या नेत्याने अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली; अन् झाली पक्षातून हकालपट्टी

224

बातमी सोलापुरातून आहे. सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना भाजपने बाहेरचा रस्ता दाखवत हकालपट्टी केली आहे. उपायुक्तांना शिवीगाळ आणि खंडणी मागितल्याप्रकरणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती.

त्यानंतर काळे यांची आज भाजपातून हकालपट्टी करण्यात आली. भाजपचे शहर सरचिटणीस शशी थोरात यांनी याबाबत घोषणा केली.  राजेश काळे यांच्यावर महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देण्यात आला होता. भाजपच्या गोटातून त्यांची उपमहापौर पदावरुन आणि पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी होती. त्यामुळे अखेर भाजपच्या कार्यकारिणीने हा निर्णय घेत