देशात कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचे चित्र आहे. दिवसागणिक येणार्या रुग्णांची संख्या ५० हजारांच्या वर गेली आहे. यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमिवरच येणार्या काही दिवसांत महाराष्ट्रातील परिस्थिती आटोक्यात न आल्यास कडल लॉकडाउन लावण्यात येईल असे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी सांगीतले. यावर महिंद्रा एण्ड महिंद्रा कंपनीचे आनंद महिंद्रा यांनी ऊद्धव ठाजरेंना सल्ला दिला आहे.
आनंद महिंद्रा यांनी एक ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे. ऊद्धवजी समस्या अशी आहे की, लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा कामगारवर्ग, स्थलांतरित मजुर, हातावर पोट असणारी गरीब जनता आणि लघू ऊद्योजक यांना बसतो. मुळात लॉकडाऊन हा आरोग्यव्यवस्था सुसज्ज करण्यासाठी आहे. आपण पुन्हा त्यावर लक्ष केंद्रित करुयात आणि मृत्यु टाळुया” असे महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मोठ्या शहरांमध्ये स्थानिक प्रशासनाने अनेक निर्बंध लावले आहेत. मुख्यमंत्र्यांनीसुद्धा रात्रीच्या जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. त्यामुळेसुद्धा अनेकांच्या रोजगारावर त्याचा परिणाम झाला आहे.
महाराष्ट्रात झपाट्याने रुग्णसंख्या वाढते आहे. बेड्स आणि जागेची कमतरता भासते आहे. आरोग्यव्यवस्थेस अधिक सुसज्ज ठेवण्याची गरज आहे. या पार्श्वभूमिवर आनंद महिंद्रा यांचा हा सल्ला ठाकरे सरकारसाठी मोलाचा ठरु शकतो.