‘या’ प्रसिद्ध डिझायनरने घेतला ‘ट्रान्सवूमन’ होण्याचा निर्णय, ‘साईशा’ नाव ठेवत केले फोटो पोस्ट

14

बॉलिवूडचा गाजलेला डिझायनर स्वप्नील शिंदे नेहमी सोशल मिडियावर सक्रिय असतो. त्याचे शो, स्टाईल, फॅशन नेहमी चाहत्यांना भुरळ पाडते. आज तो एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. त्याच्यातील झालेल्या बदलामुळे सध्या लोक आश्यर्यचकीत झाले आहेत. तो बदल म्हणजे ट्रान्सवूमन होण्याचा. डिझायनर स्वप्नील शिंदेने स्वत:ची सर्जरी करुन स्त्री होण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वप्नील साईशाच्या रुपात खूप ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे. त्याने पोस्ट करत लिहीले आहे की, ‘तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुम्हाला तुमचं बालपण नेहमीच आठवत असतं. माझ्या बालपणाच्या आठवणी फारच वाईट होत्या. कारण शाळेत आणि कॉलेजमध्ये मला विचित्र वागणूक दिली जायची कारण मी वेगळा होतो.’

याबाबतची माहिती आणि फोटो स्वप्नीलने सोशल मिडियावरून लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये स्वप्नीलने त्याच्या नव्या रुपातले फोटो टाकत एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. स्वप्नीलने आता स्वत:चं नाव साईशा असं ठेवलं आहे. स्वप्नीलला साईशाच्या रुपात पाहत बॉलिवूडकरांनी देखील पसंती दाखवली आहे. अनेकांनी या फोटोंवर कमेंटही केल्या आहेत.