आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्यांवरून राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली.
वरळीमधील एका पबमधील गर्दीचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यासंदर्भात फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना फडवीस यांनी, सोशल डिस्टन्सिंग वगैरे फक्त शिवजयंतीसाठी, नाईट लाईफचे तर आदेश मिळालेत असा टोला लगावला होता.
राज्यातील करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदाच्या शिवजयंतीवर निर्बंध आणली होती. त्यामुळे भाजपाने या मुद्यावरून महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरलं होतं. तसेच, या अगोदर राज्यभरातील धार्मिकस्थळं सुरू करण्यासाठी देखील भाजपाने आक्रमक भूमिका घेत आंदोलनं केली होती.
फडणवीस यांनी शिवजयंती व धार्मिकस्थळांचा मुद्दा उपस्थित करत, महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरेल.फडणवीस म्हणाले, या सरकारला असं वाटतं की करोना कुठं वाढतो तर फक्त मंदिरांमध्ये वाढतो. शिवजयंती आणि मंदिरं यातूनच करोना वाढतो? काहीतरी आकडेवारी द्यावी की कुठलं मंदिर उघडल्याने करोना वाढला. केवळ मंदिरच नाही तर मी सर्व धार्मिक स्थळांचा विचार करतोय.