संपूर्ण देश आता लस परदेशात पाठविण्याच्या निर्णयावर प्रश्न विचारत आहे. भाजप सरकार किती जणांना अटक करणार? जनतेचा आवाज दाबनारे हे भ्याड सरकार आहे, अशा तीव्र शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी निषेध व्यक्त केला आहे.
आता संपूर्ण देश लसीच्या प्रश्नावर प्रश्न विचारत आहे, किती लोकांवर केंद्र सरकार कारवाई करतय, हे आपण पाहूच, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
भारत हा लसीचा गुरु बनला आहे, असा दावा पंतप्रधानांनी दावोसमध्ये केला. यूएन मधील भारतीय दूतावासाने सांगितले की आम्ही परदेशात पाठवले तितके लस आम्ही भारतात पाठविली नाही. आता भाजपचे लोक म्हणत आहेत की फक्त एक कोटी लस पाठविली गेली आहे, उर्वरित पाच कोटींची लस पाठविणे सक्तीचे होते.
यामुळे, जर लस देशात उपलब्ध नसेल तर मग प्रश्न उपस्थित केले जातील; परंतु उत्तर प्रदेश, दिल्ली आणि बर्याच ठिकाणी प्रश्न विचारणाऱ्याना अटक केली जात आहे. भविष्यात किती लोकांना अटक केली जाते हेही आपण पाहू, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी व्यक्त केली.