पुणे महानगरपालिकेचे ऑक्सिजन संदर्भात ‘हे’ नवे पाऊल

6

पुणे महापालिकेच्या डॉक्टर नायडू रुग्णालयाच्या आवारात 13KL क्षमतेचा ऑक्सीजन टँक बसविण्यात आला असून याच्या साह्याने लिक्विड डूरा सिलेंडर रिफिलिंग करून पुणे मनपाच्या इतर रुग्णालयांना पुरविण्यात येत आहे. तसेच गॅस जंबो सिलेंडर रिफिलिंग प्लांटची कार्यान्वित करण्यात आला आहे.

यामुळे या ठिकाणी ऑक्सीजन सिलेंडर भरण्याची सुविधाही उपलब्ध होणार असल्याने शहरातील कुठल्याही रुग्णालयात गतीने ऑक्सिजन पुरवठा करणे सहज शक्य होईल. या संकट काळात अशी सुविधा उपलब्ध करून देणारी आपली महानगरपालिका एकमेव असू शकेल.

या प्रकल्पाची सविस्तर पाहणी करुन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आढावा घेतला. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अति. आयुक्त कुणाल खेमणार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य श्रीनिवास कंदूल, डॅा. संजीव व्हावरे, युवराज देशमुख आदी उपस्थित होते .